Koregaon Bhima Violence: भिमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांना तिसरं समन्स, आज नोंदवणार साक्ष

WhatsApp Group

पुणे – कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी (Koregaon Bhima Violence) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आज साक्ष नोंदवणार आहेत. याप्रकरणी शरद पवार यांना तिसरं समन्स मिळालं असून आज मुंबईमध्ये सुनावणी होणार आहे. भीमा कोरेगाव (Bhima Koregan) येथे घडलेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर शरद पवार पवार साक्ष देतील.

आयोगाकडून 5 आणि 6 मे रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या सुनावणीत हजर राहण्यासाठी शरद पवार यांना तिसरं समन्स देण्यात आलं आहे. त्यासाठी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पवार आयोगासमोर साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहणार असल्याची माहीती समोर आली आहे.

या प्रकरणी शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपलं अतिरिक्त प्रतिज्ञापत्रही आयोगापुढे सादर केलं होतं. तसेच 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्याकरिता आयोगापुढे हजर राहणार होते. पण काही कारणांमुळे ते साक्ष देण्यासाठी हजर राहू शकले नाहीत. मात्र आता त्यांना आता तिसरं समन्य बजावण्यात आलं असून त्यानुसार आज पवार आयोगासमोर साक्ष नोंदविण्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती मिळतेय.