सावधान! शरीरसंबंधांनंतर चुकूनही करू नका ‘या’ 4 गोष्टी; थेट हृदयावर होऊ शकतो परिणाम, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला
शारीरिक संबंधांनंतर (Intercourse) मिळणारा आनंद आणि मानसिक समाधान महत्त्वाचे असले तरी, त्यानंतर आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. लैंगिक संबंधांदरम्यान शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स तयार होतात आणि बदलतात. या प्रक्रियेत शरीराचे अंतर्गत तापमान सामान्य पातळीपेक्षा खाली जाते, ज्यामुळे बाहेरून शरीर गरम लागते. अशा बदललेल्या तापमानात काही गोष्टी केल्यास शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन गंभीर आजारांचा धोका संभवतो.
थंड पाण्याचे सेवन टाळा
अनेकदा संबंधांनंतर तहान लागल्यामुळे लोक फ्रीजमधील थंड पाणी पितात. मात्र, डॉक्टरांच्या मते हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. सेक्सनंतर शरीराचे तापमान कमी झालेले असते, अशा वेळी अचानक थंड पाणी प्यायल्याने तापमानात झपाट्याने चढ-उतार होतात. याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी कोमट किंवा साधे पाणी पिणे हिताचे ठरते.
गरम पाण्याने अंघोळ (हॉट शावर) करणे धोक्याचे
अनेक जोडप्यांना संबंधांनंतर गरम पाण्याने अंघोळ करायला आवडते. मात्र, शास्त्रोक्त दृष्टीने हे चुकीचे आहे. आधीच कमी झालेले शरीराचे तापमान गरम पाण्यामुळे अधिकच अस्थिर होते. यामुळे रक्तदाब (Blood Pressure) अचानक कमी होण्याची शक्यता असते, ज्यामुळे चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. शरीराचे तापमान पुन्हा सामान्य होण्यासाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे.
धूम्रपान (स्मोकिंग) म्हणजे हृदयाला निमंत्रण
काही जणांना शरीरसंबंधांनंतर सिगारेट पिण्याची सवय असते. मुळात धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहेच, पण संबंधांनंतर ते अधिक घातक ठरते. या काळात फुफ्फुसे आणि हृदय अधिक सक्रिय असतात, अशा वेळी निकोटिन शरीरात गेल्याने हृदयावर ताण येतो. यामुळे दीर्घकाळात फुफ्फुसाचे विकार आणि हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो.
कठोर व्यायाम किंवा हेवी वर्कआउट टाळा
शारीरिक संबंध ही स्वतःच एक प्रकारची शारीरिक हालचाल किंवा व्यायाम आहे. यानंतर लगेच जिममध्ये जाणे किंवा जड व्यायाम करणे टाळावे. यामुळे स्नायूंवर (Muscles) अतिरिक्त ताण येतो आणि थकवा जाणवतो. अतिप्रमाणात शारीरिक श्रम केल्यास हृदयावर ताण येऊन हार्ट अटॅकसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शरीरसंबंधांनंतर शरीराला विश्रांतीची नितांत गरज असते.
