IND vs SA 2022: आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला धक्क्यावर धक्के, ‘हे तीन’ स्टार खेळाडू संघाबाहेर

WhatsApp Group

IND vs SA 2022 Team India: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा स्टार खेळाडू दीपक हुड्डा दुखापतीमुळे, तर मोहम्मद शमी कोरोनाची लागण झाल्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाले आहेत. यासोबतच बीसीसीआयने हार्दिक पांड्याला विश्रांती दिली आहे. या तीन खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतासाठी मालिकेत अडचणी निर्माण होऊ शकतात.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी शाहबाज अहमदचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय दीपक हुडाच्या जागी श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेत मोहम्मद शमीच्या जागी संघात सामील झालेला उमेश यादव दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेचा भाग असेल. IPL 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या उमरान मलिकला संघात स्थान मिळालेले नाही.

दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 28 सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघांना तीन दिवसांची विश्रांती मिळाली. दुसरा टी-20 सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर आणि तिसरा सामना 4 ऑक्टोबरला इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. तिन्ही सामने सायंकाळी 7 वाजता सुरू होतील.

भारताचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रवी अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिकेचा संघ- टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, जानमन मालन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिझबासो, ड्वेन प्रेटोरियस.

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 28 सप्टेंबर 2022 तिरुवनंतपुरम
दुसरा टी-20 सामना 2 ऑक्टोबर 2022 गुवाहाटी
तिसरा टी-20 सामना 4 ऑक्टोबर 2022 इंदूर