आजपासून हे नियम बदलणार, जाणून घ्या नाहीतर होणार मोठे नुकसान

WhatsApp Group

नवी दिल्ली –  1 डिसेंबर 2021 पासून अनेक नियम बदलले आहेत. या बदलांमध्ये आधार-UAN लिंक, पेन्शन, बँक ऑफर इत्यादींचा समावेश आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी काही नवीन नियम लागू होतात किंवा जुने नियम बदलले जातात.

UAN-आधार क्रमांकाशी लिंक
तुमच्या PF खात्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आधार क्रमांकाशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर होती. जर एखाद्याने शेवटच्या तारखेपर्यंत हे काम केले नाही तर त्याच्या पीएफ खात्यात पैसे जमा होणे थांबू शकते. एवढेच नाही तर एखाद्याला पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर तेही अवघड होईल. जर कोणी आपला UAN नंबर आधार क्रमांकाशी अद्याप लिंक केला नसेल, तर त्वरीत पीएफचा व्यवहार पाहणाऱ्या विभागाशी संपर्क साधावा.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ
पेट्रोलियम कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2101 रुपये, कोलकातामध्ये 2177 रुपये, मुंबईत 2051 रुपये तर चेन्नईमध्ये 2234 रुपये झाला आहे.

बँक ऑफर आणि व्याज दरांमध्ये मोठे बदल
सणासुदीच्या काळात अनेक बँकांनी विविध गृहकर्ज ऑफर दिल्या होत्या, ज्यात प्रक्रिया शुल्क माफी आणि कमी व्याजदर यांचा समावेश होता. बहुतांश बँकांच्या या ऑफर्स 31 डिसेंबरला संपत आहेत, पण एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या ऑफरची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत आहे.
SBI च्या क्रेडिट कार्डने EMI वर खरेदी करणे 1 डिसेंबरपासून महाग होणार आहे. पूर्वी SBI कार्ड वापरल्यावर फक्त व्याज भरावे लागणार होते पण 1 डिसेंबरपासून प्रोसेसिंग फी देखील भरावी लागणार आहे. त्याचप्रमाणे पंजाब नॅशनल बँकेने 1 डिसेंबरपासून आपल्या बचत खात्यातील ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे.

जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत संपली
पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर होती. ज्यांनी जीवन प्रमाणपत्र जमा केले नाही त्यांना 1 डिसेंबरनंतर पेन्शन मिळणे बंद होऊ शकते. त्यामुळे ज्यांनी हे काम केलं नाही त्यांनी त्वरीत आपाल्या विभागाशी संपर्क साधून पुढिल माहिती घ्यावी