केंद्र सरकारची मोठी घोषणा, ‘या’ लोकांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम देते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपये पाठवले जातात.
भारत सरकारच्या या योजनेचा लाभ 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना दिला जात आहे. सध्या या योजनेचे 11 हप्ते शासनाने पाठवले आहेत. शेतकरी आता बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसानचे पैसे मिळण्यासाठी सरकारने काही नियम आणि कायदेही केले आहेत, जेणेकरून पैसे चुकीच्या व्यक्तीकडे जाऊ नयेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील लाखो शेतकऱ्यांना सरकारकडून लाभ मिळत आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये अवैध लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे. सरकार आता अशा लोकांवर कडक कारवाई करत आहे. सरकारने या लोकांना नोटीस पाठवून पंतप्रधान किसान योजनेचे पैसे लवकरात लवकर परत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसे न केल्यास अशा लोकांवर कारवाई केली जाईल.
या लोकांना पीएम किसानचे पैसे मिळणार नाहीत
ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतीयोग्य जमीन आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. जे लोक आयकर भरतात त्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही. याशिवाय डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, इंजिनियर, आर्किटेस्ट अशा व्यावसायिकांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच जे लोक पदापासून दूर झालेले आहेत ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.