
IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज T20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच खेळाडूंमध्ये भारतीय फलंदाज अव्वल-3 स्थानावर आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 649 धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितची फलंदाजीची सरासरी 40.56 आणि स्ट्राईक रेट 140.17 आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध एक शतकही झळकावले आहे.
या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने विंडीजविरुद्ध T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 570 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 57 आणि स्ट्रायकर रेट 150.79 होता.
केएल राहुल हा वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 सामन्यांमध्ये तिसरा सर्वात यशस्वी भारतीय फलंदाज ठरला आहे. राहुलने 58.83 च्या प्रभावी फलंदाजीच्या सरासरीने आणि 159 च्या स्ट्राइक रेटने 353 धावा केल्या आहेत. केएल राहुलनेही विंडीजविरुद्ध T20 शतक झळकावले आहे.
निकोलस पूरन हा भारत-विंडीज T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू आहे. पूरनने भारताविरुद्ध 39.22 च्या फलंदाजीच्या सरासरीने आणि 132 च्या स्ट्राइक रेटने 353 धावा केल्या आहेत.
या यादीत किरॉन पोलार्ड पाचव्या क्रमांकावर आहे. पोलार्डने भारताविरुद्धच्या T20 सामन्यांमध्ये 324 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 32.40 आणि स्ट्राइक रेट 124.61 होता.
भारत-विंडीज T20 सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
- रोहित शर्मा – 649
- विराट कोहली – 570
- केएल राहुल – 353
- निकोलस पूरन – 353
- किरॉन पोलार्ड – 324