जगातील सर्वात लोकप्रिय T20 लीग असलेल्या आयपीएल २०२२ ला सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस राहिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार असून संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. आज आपण आयपीएलमध्ये सर्वात जास्त शतके most 100 in IPL झळकवणाऱ्या अव्वल खेळाडूंवर एक नजर टाकणार आहोत…
1. ख्रिस गेल – 6 शतके
वेस्ट इंडिजच्या महान फलंदाज ख्रिस गेल Chris Gayle याचा आयपीएल रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. या डावखुऱ्या आक्रमक फलंदाजाने 139 डावांमध्ये एकूण सहा शतके झळकावली आहेत, त्यापैकी पाच शतके रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना आणि एक शतक पंजाब किंग्जकडून खेळताना आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रमही ‘युनिव्हर्स बॉस’ने केला. गेलने एप्रिल 2013 मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध आरसीबीसाठी 265.15 च्या स्ट्राइक रेटने केवळ 66 चेंडूत 175 धावा केल्या होत्या.
2. विराट कोहली – 5 शतके
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेले नसेल, पण आयपीएलमध्ये त्याने पाच दमदार शतके झळकावली आहेत. त्यापैकी चार शतके 2010 च्या एकाच मोसमात झाली. आयपीएलमध्ये विराटची सरासरी 37.97 आणि 130.41 स्ट्राइक रेट आहे.
3. डेव्हिड वॉर्नर – 4 शतके
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा आयपीएलचा प्रवास अप्रतिम राहिला आहे. डावखुऱ्या सलामीवीराने दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी दोन आणि सनरायझर्स हैदराबादसाठी दोन शतके झळकावली आहेत.