गेल्या काही वर्षांत, जीवन विमा पॉलिसी Life insurance policy खरेदी करण्याबाबत लोकांमध्ये बरीच जागरुकता आली आहे. मुदत विमा Term insurance हा जीवन विमा पॉलिसीचा एक भाग आहे जो मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला मोठे विमा संरक्षण देण्यास मदत करतो.
आजच्या अनिश्चिततेच्या काळात घरातील प्रमुखाचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत घरातील अवलंबितांना मुदत विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते. तुमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि विविध आर्थिक दायित्वे असल्यास मुदतीचा विमा घेणे हे एक शहाणपणाचे पाऊल ठरू शकते.
आजकाल बाजारात अशा अनेक विमा कंपन्या आहेत ज्या मुदतीच्या विमा पॉलिसी विकतात. परंतु, मुदत विमा Term Insurance घेताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे अनेक वेळा समजत नाही. तुम्हीही मुदत विमा घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
मुदत विमा खरेदी करताना तुमच्या कुटुंबाच्या गरजांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. वर्तमान आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन मुदत विमा खरेदी करा. असे अनेकवेळा दिसून आले आहे की लोक मुदतीचा विमा खरेदी करतात परंतु, त्यांच्या गरजेनुसार तो पुरेसा नाही. आर्थिक तज्ञांच्या मते, मुदत विमा तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 9 ते 10 पट असावा.
यासोबतच पॉलिसी घेताना हे लक्षात ठेवा की पॉलिसी घेताना तुमचे वय काय आहे. जर तुम्ही तरुण वयात पॉलिसी खरेदी करत असाल, तर तिचा कालावधी जास्त ठेवा.
मुदत विमा घेताना लोकांची एक सामान्य चूक म्हणजे ते त्यांच्या आजाराची माहिती देत नाहीत. हे करणे टाळा. तुम्हाला आधीपासून कोणत्याही प्रकारच्या आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास, विमा कंपनीला कळवा. यामुळे, नंतर क्लेम घेताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
मुदत विमा खरेदी करताना, तुम्ही फक्त तीच कंपनी निवडावी, ज्याचे क्लेम सेटलमेंट रेशो जास्त असेल. यामुळे तुमच्या कुटुंबियांना नंतर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.