India Vs Bangladesh: रोहित शर्मासह ‘हे’ 3 खेळाडू एकदिवसीय मालिकेतून बाहेर

WhatsApp Group

India Vs Bangladesh: ढाका येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. रोमहर्षक सामन्यात बांगलादेशने 5 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना संघाने 272 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ 9 गडी गमावून 266 धावाच करू शकला. अखेर दुखापतग्रस्त कर्णधार रोहित शर्माने संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र संघाला विजय मिळवून देता आला नाही. या पराभवासोबतच टीम इंडियाला आता एकाच वेळी 3 मोठे धक्के बसले आहेत. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह 3 खेळाडूंना वनडे मालिकेतून वगळण्यात आले आहे, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कॅच घेताना कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला होता. बॉल त्याच्या बोटांमध्ये आदळला आणि रक्त वाहू लागले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयातही नेण्यात आले, सामन्याच्या शेवटी रोहित फलंदाजीला आला. पण आता त्याच्या फिटनेसबाबत मोठे अपडेट देत राहुल द्रविडने आता उपचारासाठी मुंबईला रवाना होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याला वनडे मालिकेतून वगळण्यात आले आहे. यासोबतच कुलदीप सेनला पाठीच्या दुखापतीमुळे व दीपक चहरला दुखापत झाल्यामुळे वगळण्यात आले आहे.

बांगलादेश दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाला सलग दुसऱ्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, टीम इंडियाने पुन्हा एकदा गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर यजमानांपेक्षा हलके असल्याचे सिद्ध केले, ज्यामुळे मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवाची जखम आणखीनच गडद झाली आहे.

7 डिसेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जिथे खराब सुरुवात केल्यानंतर त्यांच्या संघाने भारतासमोर 273 धावांचे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाला केवळ 266 धावा करता आल्या. त्यामुळे यजमानांनी 5 धावांनी या विजयासह मालिकेवरही कब्जा केला.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा