बारावीच्या पेपरमध्येच निघाली चूक, विद्यार्थ्यांना लागली लॉटरी

WhatsApp Group

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा कालपासून सुरू होत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके, महिला पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.

आज झालेल्या बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये एक प्रश्नच चुकीचा असल्याने त्या प्रश्नाचा 1 गुण प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळणार असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.