
मुंबई – मुंबईमधील (Mumbai) पूर्व उपनगरांमध्ये काही भागात पाणीपुरवठा (Water supply) बंद राहणार आहे. महापालिकेच्या (Municipal Corporation) एन विभागात सोमैया नाल्याखालून महानगरपालिका वसाहत, विद्याविहार या ठिकाणी सूक्ष्मबोगदा पद्धतीने जलवाहिन्या वळविण्याचे Phase-I चे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी बुधवार १८ आणि गुरूवार १९ या दिवशी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
सूक्ष्मबोगदा म्हणजे मायक्रोटनेलिंग पद्धतीनं जलवाहिन्या वळविण्याच्या कामासाठी महापालिकेच्या एल पूर्व विभाग, एन विभाग, एम पश्चिम विभाग, एफ उत्तर विभाग, एफ उत्तर विभाग, एफ दक्षिण विभाग या विभागामध्ये पाणी पुरवठा बंद आणि कमी दाबाने करण्यात येणार आहे. यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेतर्फे (Municipal Corporation) करण्यात आले आहे.