मुंबई – मुंबईकरांसाठी चांगली बातमी समोर येत आहे. कोरोना संसर्गाची स्थिति नियंत्रणात येत असल्याने मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या नवीन निर्देशानुसार मुंबईतील रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंतची संचारबंदी हटवण्यात आली आहे.
मुंबईत काय सुरू होणार
- उद्याने, मैदाने नियमित वेळेनुसार सुरू राहतील.
- मनोरंजन पार्क, थीम पार्क 50% क्षमतेने सुरू राहतील.
- जलतरण तलाव, वॉटरपार्क 50% क्षमतेने सुरू राहतील.
- हॉटेल, रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, नियमित वेळेनुसार 50% क्षमतेने सुरू राहतील.
- लग्न समारंभासाठी मोकळ्या मैदानांमद्धे 25% क्षमतेने आणि सभागृहात 200 जणांना उपस्थितीची परवानगी.
- भजनांसह इतर सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रम सभागृह किंवा मंडपांमद्धे 50% क्षमतेने उपस्थितीची परवानगी.
कोरोना संसर्गाचे प्रमाण सातत्याने कमी होतं आहे त्यामुळे निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी व्यापारी आणि उद्योजकांकडून सातत्याने केली जात होती. हे लक्षात घेउन महानगरपालिकेने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सर्व सवलती लसीकरणाच्या अटींच्या आधारे देण्यात आल्या आहेत.