सोसाट्याच्या वाऱ्यासह, विजांचा कडकडाट अन् गारा पडण्याचा अंदाज, ‘या’ 15 जिल्ह्यांना Yellow Alert

WhatsApp Group

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील (Maharashtra) विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस (unseasonal rain) पडत आहे. हवामान खात्याकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, आता पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळ किनारपट्टी ते कोकण किनाऱ्यापर्यंत 10 मार्चपर्यंत महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat), पूर्व राजस्थान, पश्चिम मध्यप्रदेशामध्ये वीजांच्या गडगडाटासह जोरदार वारा आणि हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

15 जिल्ह्यांना यल्लो अलर्ट
हवामान खात्याकडून राज्यातील एकूण 15 जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जारी करण्यात आला. यामध्ये पालघर, ठाणे,सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी,सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.

नाशिक शहरासोबत जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्यास सकाळीच सुरुवात झाली आहे. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नाशिकरांना गारवा अनुभवायला मिळत आहे. मात्र, त्याच दरम्यान अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा पीक धोक्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये ढगाळ वातावरण सुद्धा आहे.