Viral Video : ‘जरा-जरा टच-मी-टच मी’ गाण्यावर डान्स करत होती तरुणी, अचानक कुत्र्याने घेतला चावा

WhatsApp Group

Viral Video : डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. सोशल मीडिया यूजर्स सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर डान्सचे व्हिडिओ अपलोड करत राहतात. सध्या इंटरनेटवर एका मुलीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगी डान्स करताना रील बनवत आहे. मात्र त्यानंतर एक कुत्रा मुलीच्या मागे येतो आणि तिला चावतो.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ‘जरा-जरा टच मी टच मी टच मी’ या गाण्यावर ती तरुणी डान्स करत आहे आणि अचानक एक कुत्रा तिच्यावर हल्ला करतो. तिच्या मांडीचा चावा कुत्र्याने घेतला आहे. या हल्ल्यात ती जखमही झाली आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही तरुणी आपल्या मांडीला झालेल्या जखमेला औषध लावत आहे व एक तरुण तीला 14 इंजेक्शन्स घेण्याचा सल्ला देत आहे.