
Viral News : जगात अशी बरीच प्रकरणे असतात, ज्यावर विश्वास ठेवणे अनेकदा कठीण होते. यातील काही गोष्टी तर अशा असतात की ज्यावर आपला विश्वासच बसत नाही. महिला (Women) गर्भवती राहणे आणि बाळाचा जन्म होणे हे निसर्गाचे एक वरदानच मानले जाते. तसे पाहत्या जुळ्यांचा जन्म होणे ही गोष्ट काही नवीन राहिली नाही. मात्र, जुळ्यांचा जन्म (Babes) झाल्यानंतर त्यांचे वडील वेगवेगळे निघाले तर…? वाचून धक्का बसेल पण खरचं असं घडलं आहे.
पोर्तुगालमध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षांच्या तरुणीने जुळ्या बाळांना जन्म दिला होता. त्यांची डीएनए टेस्ट करण्यात आली. त्यावरून धक्कादायक बाब समोर आली. जुळ्या मुलांपैकी एका मुलाचे वडील वेगळे होते, तर दुसऱ्याचे वेगळे होते. अशा प्रकारची ही जगातील केवळ 20 वी घटना आहे. याआधी जुळ्या मुलांचे वडील वेगवेगळे असण्याच्या केवळ 19 घटना नोंदवल्या गेल्या आहेत. वैद्यकशास्त्राच्या भाषेत या प्रकाराला ‘हॅट्रोपॅरेंटल सुपरफेक्यूंडेशन’ (Heteroparental Superfecundation) असे म्हटले जाते.
पोर्तुगालमधील मिनेरिअस या छोट्याशा शहरामध्ये राहणाऱ्या तरुणीने जेव्हा जुळ्या मुलांना जन्म दिला, तेव्हा तिच्या पार्टनरने मुलांची डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली. आपल्या मुलाचे वडील आपणच आहोत की नाही, याचा त्याला संशय आला. त्यामुळे त्याने आपल्या पार्टनर तरुणीकडे मुलांची डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली. त्याला तरुणीनेही मान्यता दिली आणि बाळांची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यापैकी एका बाळाचा वडील हा तरुणीचा सध्याचा पार्टनर असल्याचं सिद्ध झालं. मात्र दुसऱ्या बाळाचा वडील मात्र वेगळीच व्यक्ती असल्याचे या टेस्टमधून समोर आले. टेस्टचा हा निकाल पाहून बाळाच्या वडिलांना तर धक्का बसलाच, मात्र त्याच्या आईलाही धक्का बसला. आपल्या जुळ्या बाळांचे वेगवेगळे वडील असू शकतात, याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती.
पोर्तुगालमधील या तरुणीचे एकाच वेळी दोन पुरुषांसोबत संबंध होते. दोघांसोबतही वेगवेगळ्या काळात तिचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. मात्र आपल्याला होणारी जुळी बाळं ही दोघांपैकी एकाच कुणापासून तरी राहिली असावीत, असेच तिला वाटत होतं. टेस्टचा निकाल पाहून तिला जबर धक्का बसला. जुळ्या बाळांचे वडील वेगवेगळे असले तरी त्यांचे चेहरे अगदी एकमेकांशी मिळतेजुळते आहेत. बाळं आठ महिन्यांची असताना ही टेस्ट कऱण्यात आली होती आणि त्यांच्या वडिलांची ओळख पटली होती. आता ही बाळं अडीच वर्षांची झाली असून दोन्ही बाळं आपल्या आईसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.