
12 मे रोजी गुरुवारीच तिने आपला 21 वा बर्थडे साजरा केला. पण हा वाढदिवसच तिचा शेवटचा वाढदिवस असेल असे कोणालाच वाटलं नाही. वाढदिवसाला तिच्या मृत्यूची बातमी तिच्या कुटुंबाच्या कानावर पडली. वाढदिवशीचअभिनेत्री आणि मॉडेलचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
तिने आत्महत्या केल्याचं तिच्या नवऱ्याने म्हटले आहे. तर नवऱ्याने तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे. केरळमधील मॉडेल आणि अभिनेत्री सहानाचा मृतदेह सापडला आहे. 12 मे रोजी तिचा 21 वाढदिवस झाला. त्यानंतर 13 मे रोजी रात्री 1 वाजता तिच्या कुटुंबाला तिच्या मृत्यूची बातमी मिळाली.
तिचे कुटुंब कासारगोड जिल्ह्यामध्ये राहतं. तिच्या नवऱ्याने तिने आत्महत्या केली असं म्हटलं आहे. तर कुटुंबाने तिची हत्या झाली असून नवऱ्यानेच हत्या केली असा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तिचा नवरा साजिदला आपल्या ताब्यात घेतले आहे.