World’s Oldest Tiger: जगातील सर्वात वयस्कर वाघाचा मृत्यू झाला आहे, ‘राजा’ नावाच्या या वाघाला पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वार येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले होते, वाघाचे वय 25 वर्षे 10 महिने आणि 18 दिवस होते. 23 ऑगस्ट रोजी राजाचा 27 वा वाढदिवस साजरा होणार होता, राजाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी वनविभागाने सर्व तयारी केली होती, मात्र त्यापूर्वीच राजाचा मृत्यू झाला.
Alipurduar, WB | People pay tribute to 25-year-old tiger Raja from SKB rescue centre who passed away today
(Source: DM & DFO Alipurduar) pic.twitter.com/pkxS7Q5CgP
— ANI (@ANI) July 11, 2022
2006मध्ये हा राजा नावाचा वाघ जखमी अवस्थेत सुंदरबनमधून पकडण्यात आला होता. तेव्हापासून त्याला व्याघ्र पूनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले होते. वनविभाकडून सांगण्यात आले की, सुंदरबनमधील माताळा नदी ओलांडात असताना मगरीने त्याच्यावर हल्ला केला होता. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सुंदरबनमध्ये वाघांची संख्या 96 होती. आता राजाच्या निधनानंतर ही संख्या 95 वर आली आहे.