
मुंबई – जगातील सर्वात मोठी उद्वाहक (Elevator) किंवा लिफ्ट (Lift) कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? उत्तर माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर सांगतो. जगातली सर्वात मोठी लिफ्ट ही आतापर्यंततरी आपल्याच देशात आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई (Mumbai) शहरात जगातली सर्वात मोठी लिफ्ट आहे. कोन एलेविटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (KONE India PVT. LTD) या कंपनीने जगातील सर्वात मोठी लिफ्ट भारतात तयार केली आहे. ५ मे २०२२ ला (गुरुवारी) या लिफ्टचे लोकार्पण करण्यात आलं.
Lift at Jio gardens Bandra Kurla Complex (BKC) , Bandra East, Mumbai, Maharashtra. World’s largest Elevator. Capacity of 200 persons. pic.twitter.com/PIvtquyjph
— HWCFMumbai (@HWCFMumbai) May 17, 2022
भल्या मोठ्या टोलेजंग इमारतींमध्ये लिफ्ट असतात. मात्र जगातली सर्वात मोठी लिफ्ट ही मुंबईमध्ये आहे. या लिफ्टमध्ये एकावेळी १५-२० नव्हे तर तब्बल २०० लोकं उभे राहू शकतात. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (BKC) मध्ये जगातील सर्वात मोठ्या क्षमतेची लिफ्ट कार्यान्वित करण्यात आली आहे.
जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio World Convention Centre) ही लिफ्ट कार्यान्वित करण्यात आलं आहे. २५.७८ चौरस मीटरच्या क्षेत्रफळामध्ये पसरलेली ही लिफ्ट एकावेळी 200 लोकांना वाहून नेण्यास सक्षम आहे. जिओ कन्व्हेन्शन सेंटरमधील या लिफ्टला पाच थांबे असतील. तर, या लिफ्टचे वजन १६ टन आहे. त्यामुळे ही जगातील सर्वात मोठी लिप्ट बनली आहे.