महिलेला 11 लाख रुपयांना पडला 1 पिझ्झा, तुमचीही अशी फसवणूक होऊ शकते…

WhatsApp Group

मुंबई – महाराष्ट्रात एका वृद्ध महिलेची 11 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, सायबर गुन्हेगारांनी महिलेच्या खात्यातून सुमारे 11 लाख रुपये ट्रान्सफर केले गेले आहेत.

महिलेची बँक खाती आणि इतर माहिती चतुराईने सायबर गुन्हेगाराने जाणून घेत हा गुन्हा केला. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिताच्या कलम 420 आणि इतर संबंधित तरतुदींनुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, वृद्ध महिला पिझ्झा आणि ड्रायफ्रूट्स ऑनलाइन ऑर्डर करताना चुकून जास्त पैसे दिले. आपण जास्त दिलेले पैसै तिला परत मिळवायचे होते. यासाठी त्या महिलेने गुगलवर सर्च केलं. अंधेरी परिसरात राहणाऱ्या या महिलेने इंटरनेटवर पैसे कसे परत मिळवायचे याचा शोध घेतला असता तिला एक फोन नंबर सापडला.

महिलेने या क्रमांकावर कॉल केला असता तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील, पण ते अ‍ॅपद्वारेच मिळेल, असे उत्तर देण्यात आले. महिलेला एक खास अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. महिलेने सांगितले की अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतरही पैसे परत आले नाहीत तेव्हा तिला संशय आला आणि तिने खाते तपासले. यादरम्यान त्या महिलेच्या खात्यातून अन्य दुसऱ्या खात्यावर तब्बल 11.48 लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्या महिलेने पोलिसांत तक्रार केली. या सायबर गुन्हेगाराचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे