
हरियाणा – हरियाणाच्या (Haryana) झज्जरमधून (Jhajjar) एक हृदयद्रावक अपघाताची बातमी समोर आली आहे. जिथे एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडले आहे. यामध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 11 जण जखमी असल्याचेही सांगण्यात येत आहे. झज्जर जिल्ह्यातील टोल प्लाझासमोर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर तो रस्त्यावरून फुटपाथवर गेला. या फुटपाथवर अनेक मजूर झोपले होते, त्यांना ट्रकने चिरडळे. या मजुरांना चिरडत ट्रक पुढे सरकला आणि नंतर उलटला. जखमी झालेल्या 11 जणांपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.