Ran Bazar Trailer: मराठी वेबविश्वाला हादरून टाकणारा ‘रानबाजार’चा ट्रेलर पाहिलात का?

WhatsApp Group

बहुप्रतिक्षित मराठी वेबसीरिज‘रानबाजार’चा (Ran Bazar Web Series) खळबळ उडवून देणारा ट्रेलर रिलीज झाला आहे. रेगे’ आणि ‘ठाकरे’ सारखे संवेदनशील विषय प्रभावीपणे हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे (Abhijit Panse) आपली या वेबसीरिजच्या रुपाने आपली नवी कलाकृती घेऊन पुन्हा सज्ज आहेत. मराठीमधील या भव्य वेबसीरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी (Planet Marathi), अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल (A Vistas Media Capital) कंपनीने केली आहे.

दोन दिवसांपूर्वी या बोल्ड वेबसीरिजचे (Bold Marathi webseries) दोन टीझर रिलीज करण्यात आले होते. या टीझर्संनी मराठी कलाविश्वात खळबळ उडवून दिली होती. मराठीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि सोज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेली प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांचा या वेबसीरिजमध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे.

रानबाजारच्या टीझरनंतर आता ट्रेलरने देखील खळबळ उडवून दिली आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची वेबसीरिजबाबत उत्सुकता आता आणखी वाढली आहे. मराठी वेबसीरिजच्या विश्वात असा बोल्ड आणि संवेदनशील विषय हातळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात येत आहे.

ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms

For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook