कपिल देव यांच्या भूमिकेतील रणवीर सिंह प्रेक्षकांना आवडतोय, पाहा ’83’ चा दमदार ट्रेलर
मुंबई – ’83’ च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 ला मोठ्या पडद्यावर येणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित आहे.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर कपिल देव यांच्या पत्नी रोमीची भूमिका ही दीपिका पदुकोण करत आहे. दीपिका पदुकोण, कबीर खान, विष्णू वर्धन इंदुरी, साजिद नाडियादवाला, फँटम फिल्म्स, रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
What a trailer!
Did you get goosebumps as well while watching the trailer for #ThisIs83?#83Trailer pic.twitter.com/PFsd90lB2C
— Filmfare (@filmfare) November 30, 2021
’83’ हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत 24 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट 3D मध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.
’83’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंह भूमिका पाहून त्याचे चाहते जाम खुश असून त्याच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा करत आहेत. ’83’ चा ट्रेलर पाहिल्यावर सोशल मीडियावर लोक आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत.
ट्रेलरमध्ये रणवीर सिंहचा अभिनय पाहिल्यानंतर चाहते खूश असून अनेक लोक म्हणत आहेत की हा चित्रपट ऐतिहासिक ठरणार आहे. तसेच अनेंकानी त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
’83’ हा चित्रपट 1983 च्या भारताच्या वनडे क्रिकेट विश्वचषकातील ऐतिहासिक विजयाची कथा सांगणारा चित्रपट आहे. 1983 मध्ये लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा धक्कादायक पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता.