
CT-1 वाघ वन विभागाकडून गडचिरोली वन क्षेत्रात जेरबंद करण्यात आला आहे. आतापर्यंत 13 जणांवर या वाघाने वडसा, भंडारा व ब्रह्मपुरी भागात हल्ला केला होता. त्यामुळे त्याच्याबद्दल भीती सर्वसामान्यांच्या मनात होती.
वडसा #गडचिरोली वन क्षेत्रात CT-1 वाघाला वन विभागाने केले जेरबंद. त्या वाघाने वडसा, भंडारा व ब्रह्मपुरी भागातील १३ माणसांना हल्ला करून मारले होते. pic.twitter.com/hVuqescTo4
— DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli) October 13, 2022
गेल्या 3 महिन्यांपासून ताडोबातील विशेष पथकाकडून या वाघाला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, यात यश येत नव्हतं. आता अखेर या वाघाला जेरबंद करण्यात यश आलं आहे.