
अनेकदा सुट्टीच्या वेळी आपण बाहेर फिरायला जातो. जर तुमच्याकडे एखादा पाळीव प्राणी असेल तर तुम्ही त्यालाही आपल्यासोबत घेऊन जात असाल. काही लोक पाळीव कुत्रे आणि काही पाळीव मांजरांना त्यांच्यासोबत फिरायला घेऊन जातात, पण तुम्ही कधी वाघाला माणसांसोबत फिरताना पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये आपण वाघासोबत एक महिला बोटीवर बसून फेरी मारत आहे. ही महिला त्या वाघाला अजिबात घाबरलेली दिसत नाहीय. हा व्हिडीओ जुना असला तरीही लोकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की एका महिलेने वाघाला छोट्या बोटीवर बसवले आहे. ती महिलाही त्याच बोटीवर बसून नदीमध्ये पॅडल मारत बोट चालवत आहे. पुढे बसलेला वाघ पाण्याकडे पाहत आहे, तर बाई हसत हसत पॅडल मारत आहे. वाघाने एक पाय पाण्यामध्ये टाकला असून तो या राइडचा आनंद घेत आहे. या महिलेच्या चेहऱ्यावर वाघाची भीती नाही. सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत.