
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 टी-20 मॅचच्या (India vs South Africa T20) सीरिजची तिसरी मॅच मंगळवारी विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो चा आहे, कारण या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडिया सीरिजही गमावेल. या सीरिजमध्ये टीम इंडिया लागोपाठ 12 टी-20 आंतरराष्ट्रीय विजय मिळवत उतरली होती, पण दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन्ही टी-20 मध्ये भारताचा पराभव केला. पहिल्या सामन्यामध्ये बॉलर्स तर दुसऱ्या सामन्यात बॅटिंग टीमच्या पराभवाचं कारण ठरली. दोन्ही सामन्यांमध्ये ऋषभ पंतच्या कॅप्टन्सीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला होता. 212 धावांचे मोठे लक्ष्य असतानाही दक्षिण आफ्रिकेने हा सामना 7 गडी राखून सहज जिंकला. दुसऱ्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि लक्ष्याचा पाठलाग करताना 4 गडी राखून सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली असून मालिका जिंकण्यासाठी त्यांना फक्त 1 विजय आवश्यक आहे.
आता पुढील तिन्ही सामने भारतीय क्रिकेट संघासाठी करो या मरोचे असणार आहेत. तिसरा सामनाही भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, जर या सामन्यात भारताचा पराभव झाला तर मालिकाही गमवावी लागेल.
भारताचा संघ – ऋषभ पंत (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
आफ्रिकेचा संघ – टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कांगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन,