यूपीमध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान, ‘या ‘ दिग्गजांचे ठरणार भवितव्य

WhatsApp Group

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यातील निवडणुकीमधील तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे UP Election 2022. 16 जिल्ह्यामधील 59 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. या जागांवर एकूण 627 उमेदवार रिंगणात उभे आहेत. 2.15 कोटीहून अधिक मतदार 627 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे.

यूपीमध्ये ज्या 59 विधानसभा जागांसाठी आज मतदान होणार आहे. त्यामध्ये हाथरस, फिरोजाबाद, एटा, कासगंज, मैनपुरी, फारुखाबाद, कन्नौज, इटावा, औरैया, कानपूर देहात, कानपूर नगर, जालौन, झांसी, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

यूपी विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, शिवपाल सिंह यादव आणि केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल तसेच कानपूरच्या महराजपूर मतदारसंघामधून भाजपचे दिग्गज नेते सतीश महाना, हाथरस जिल्ह्यातून सादाबाद मतदारसंघामधून रामवीर उपाध्याय, फारुखाबाद सदरमधून माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद, कन्नौज सदर विधानसभा मतदारसंघातून कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांचे भवितव्य पणाला लागले आहे.