ठाकरे गटाचा खासदार थोडक्यात बचावला, डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न

0
WhatsApp Group

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले आहेत. ते राहत्या घरापासून काही अंतरावरच ते मॉर्निंग वॉकला निघाले होते. तेव्हा एक भरधाव डम्पर त्यांच्या अंगावर आला.  ओमराजे यांनी रस्त्याच्या कडेला उडी मारल्यामुळे मोठा अनर्थ टळला ते थोडक्यात बचावले.

त्यांनी पाठीमागून येणाऱ्या बाईकवाल्याकडे लिफ्ट मागत डम्परचा पाठलाग केला आणि रेल्वे गेट परिसरात डम्पर चालकाला पकडले.  रामेश्वर कांबळे असे या डम्पर चालकाचं नाव आहे. बाईकवाल्याला ओव्हरटेक करत असताना हा प्रकार असं चालकाने सांगितलं. या सर्व घटनेमागे घातपात तर नाही ना याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.