
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरुन वाद वाढत आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या अपमानास्पद वक्तव्यानंतर अनेक दहशतवादी संघटनांनी धमक्याही दिल्या आहेत. आता या धमक्यांमध्ये दहशतवादी संघटना अल कायदाचेही नाव जोडले गेले आहे. अल कायदाच्या AQIS ने भारतात आत्मघाती हल्ले करून बदला घेण्याचा इशारा दिला आहे.
दहशतवादी संघटना AQIS ने मीडियाला एक पत्र जारी करून हिंदूंना मारण्याचा इशारा दिला आहे. आत्मघातकी हल्ल्यात पैगंबरांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात बोलणाऱ्या जगातील प्रत्येक धाडसी व्यक्तीला आम्ही मारून टाकू, असे या पत्रात लिहिले आहे.