दगडू-प्राजूच्या प्रेमात आलं नवीन फुलपाखरु? Timepass 3 चा धडाकेबाज टीझर रिलीज

WhatsApp Group

रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास 3’ (Timepass 3 Teaser) या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाला टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘टाईमपास’च्या सीरिजमधील या तिसऱ्या भागामध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रथमेश परब (Prathamesh Parab) यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

या चित्रपटात बहुतेक अभिनेत्री हृताचा कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे आणि त्याचीच झलक या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबा शप्पथ, आणतोय तीच मजा, तोच टाईमपास एका वेगळ्या अंदाजात. पाहा दगडू आणि पालवीच्या गोष्टीची झलक,’ असं कॅप्शन देऊन हृताने सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.