IND vs SA 5th T20I : इतिहास घडवण्याच्या रिषभ पंतच्या संधीवर पावसाचे पाणी; T20 मालिका 2-2 ने बरोबरीत संपली

WhatsApp Group

IND vs SA 5th T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील निर्णायक सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरू येथे खेळला जात होता. या सामन्यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत 2-2 अशी बरोबरी होती. नाणेफेक वेळेवर झाली, पण मध्येच मुसळधार पावसामुळे सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही आणि पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाणेफेक वेळेवर घेण्यात आली, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड फलंदाजीसाठी मैदानात उतरणार होते त्याचवेळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नियोजित वेळेपासून 50 मिनिटे उशिराने सामना सुरू झाला. इशान किशन आणि ऋतुराज गायकवाडच्या रूपाने भारताने लवकर 2 गडी गमावले होते.

चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूनंतर पंचांनी पुन्हा एकदा पावसामुळे सामना थांबवला. मात्र नंतर पाऊस थांबायची चिन्ह न दिसल्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत 2-2 अशी बरोबरी होती.

0-2 अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्घची मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. भारताने तिसरी व चौथी लढत जिंकून मालिकेतील चुरस अधिक वाढवली. पाचवा सामना आज बंगळुरू येथे खेळवण्यात आला पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला मात्र या सामन्यात भारताने विजय मिळवला असता तर आफ्रिकेविरुद्ध T20 मालिका जिंकणारा रिषभ पंत हा पहिला भारतीय कर्णधार ठरला असता. यापूर्वी विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांनाही असा पराक्रम करता आलेला नाही.