
टिकटॉक स्टार लेडी कंडक्टर मंगल गिरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. कळंब आगार व्यवस्थापक यांनी हे निलंबन मागे घेतलं आहे. मंगल गिरी यांनी कामावर असताना कंडक्टरच्या ड्रेसमध्ये रिल्स आणि व्हिडिओ बनवले होते. त्यामुळे त्यांना वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता.
माझ्यासह इतर अनेकांनी केलेल्या मागणीची दखल घेत अखेर #InstaStar मंगल गिरी या महिला कंडक्टरचं निलंबन रद्द करण्यात आलं. याबद्दल सरकारचे आभार!
भविष्यात गिरीताई याही #ST च्या गणवेशाचा आदर ST चा सन्मान राखतील अशी अपेक्षा! https://t.co/1mgRVfh5gL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 14, 2022
या निलंबनाची बातमी पसरल्यानंतर सोशल मीडियात देखील गिरी यांच्यावर केलेली कारवाई चुकीची आहे असं म्हटलं जात होतं. अनेक राजकीय नेत्यांनीही यात एसटी महामंडळाच्या कारवाईवर आक्षेप घेतला होता. अखेर त्यांची चौकशी करून एसटी महामंडळाने हे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.