महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने मलिक आणि देशमुखांच्या मतदानाची परवानगी नाकारली

WhatsApp Group

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे. ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मतदानाची परवानगी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टानेमध्ये याचिका दाखल केली होती.

मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना दिलासा देण्यास नकार दिला असून, त्यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आली आहे.