
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा हंगाम सुरू आहे. विशेषत: क्रिकेटवर अनेक चित्रपट बनत आहेत. रणवीर सिंगच्या ‘८३’ नंतर अनुष्का शर्मा ‘चकदा एक्सप्रेस’ घेऊन येत आहे. त्याचबरोबर तापसी पन्नू ‘शाब्बास मिथू’ (Shabaash Mithu)मध्येही दिसणार आहे. तापसी पन्नू(Taapasi Pannu)च्या या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. ‘शाब्बास मिथ्थू’ चित्रपट १५ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
‘शाब्बास मिथू’चे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. यापूर्वी हा चित्रपट गेल्या वर्षी ५ फेब्रुवारीला रिलीज होणार होता. त्यावेळी याचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया करत होते. पण कोरोना महामारीमुळे ‘शाब्बास मिथू’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. जून २०२१ मध्ये, दिग्दर्शक सृजित मुखर्जी यांनी राहुल ढोलकियाची जागा घेतली. आता ‘शाब्बास मिथू’ची नवीन रिलीज डेट १५ जुलै आहे. या चित्रपटामध्ये तापसी पन्नू भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची भूमिका साकारत आहे.
View this post on Instagram
तापसी पन्नूने ‘शाब्बास मिथू’च्या नवीन पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. तापसीने लिहिले, ‘स्वप्न आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्लानिंग असलेल्या मुलीपेक्षा जास्त प्रभावशाली अजून काहीही नाही. या ‘जंटलमन्स गेम’मध्ये बॅटने आपल्या स्वप्नाचा पाठलाग करणाऱ्या मुलीची ही कथा आहे.