Maharashtra Rain : हवामान केंद्र मुंबईने गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता पाहता हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
त्याचवेळी रायगड आणि पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय शुक्रवारी सातारा, रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याआधी बुधवारीही राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर पाणी साचण्याची समस्याही निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘चांगल्या ते समाधानकारक’ श्रेणीत नोंदवला जात आहे.