MPSC संदर्भात राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

WhatsApp Group

मुंबई: राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एमपीएससीच्या (MPSC) परिक्षेचा अभ्यासक्रम बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आज पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील चर्चेनंतर शिंदे सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरुन आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर या निर्णयासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे.