भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन प्रिटोरियसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने सोमवारी (9 जानेवारी) त्याची अधिकृत माहिती दिली. प्रिटोरियसचा हा निर्णय आफ्रिकन चाहत्यांना धक्का देणारा आहे.
33 वर्षीय प्रिटोरियसने जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तो शेवटचा दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीमध्ये ऑक्टोबर 2022 मध्ये भारताविरुद्ध दिसला होता. प्रिटोरियस म्हणाला, ‘मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात कठीण निर्णय घेतला. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या उर्वरित कारकिर्दीत टी-20 क्रिकेट आणि इतर लहान फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करेन.
View this post on Instagram
सप्टेंबर 2016 मध्ये आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रिटोरियसने दक्षिण आफ्रिकेसाठी ३ कसोटी, 27 वनडे आणि 30 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर एकूण 536 धावा आणि 77 विकेट आहेत. प्रिटोरियस हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज (csk) संघाचा भाग आहे. गेल्या वर्षी मेगा लिलावात त्याला चेन्नई संघाने 50 लाख रुपयांना खरेदी केले होते. IPL 2023 च्या मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले होते. गेल्या वर्षी त्याने चेन्नईसाठी 6 सामने खेळले, ज्यात त्याने 44 धावा केल्या आणि 6 विकेट्स त्याच्या खात्यात जमा केल्या.