
कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होत आहे. रत्नागिरी ट्रॅक्शन सबस्टेशन (टीएसएस) पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले आहे. कोकण रेल्वेने 15 सप्टेंबर 2022 पासून टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विजेच्या इंजिनासह चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
दादर सावंतवाडी तुतारी तसेच मंगला एक्सप्रेस 15 सप्टेंबर 2022 पासून मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस तसेच दिवा सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस 20 सप्टेंबर 2022 पासून विजेच्या इंजिनासह चालवली जाईल. मडगाव ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी गाडी देखील 15 सप्टेंबर 2022 पासून विजेच्या इंजिनासह चालवली जाईल. जनशताब्दी एक्सप्रेस 15 ऑक्टोबर 2022 पासून तर मुंबई मंगलोर (मंगळुरू) एक्सप्रेस 1 जानेवारी 2023 पासून विजेच्या इंजिनासह चालवली जाईल. मुंबई सीएसएमटी ते करमाळी तेजस एक्सप्रेस 15 ऑक्टोबर 2023 पासून विजेच्या इंजिनासह सुरू होईल.