सिंधुदुर्गच्या पुत्राने तिळावर साकारली महाराजांची प्रतिमा

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी तिळाच्या दाण्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र साकारून महाराजांना मानवंदना दिली आहे. मेस्त्री हे आपल्या कलेतून नेहमीच विविध संदेश देत असतात. यावेळी शिवजयंती निमित्ताने ही सूक्ष्म कलाकृती त्यांनी साकारली आहे.अक्षय मेस्त्री यांनी यापूर्वी असंख्य महनीय व्यक्तींना मानवंदना दिली आहे.

भारतरत्न लता मंगेशकर, दशावतारी लोकराजा सुधीर कलिंगण, पद्मश्री सिंधुताई सकपाळ, बाळासाहेब ठाकरे, भारूडरत्न निरंजन भाकरे, बिपीन रावत, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, बाबासाहेब पुरंदरे अशा व्यक्तींना आपट्याच्या पानावर, तुळशीच्या पानावर, सुपारीवर, वृत्तपत्रावर, विटांवर तर कधी तिळावर अत्यंत कमी वेळेत सुंदर चित्र साकारून एक वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली वाहत आले आहेत.

यावेळी शिवजयंतीचे निमित्त साधून मेस्त्री यांनी चक्क तिळावर छत्रपती शिवाजी महाराज साकारले आहेत. यासाठी त्यांनी तीन महिने सराव केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे तिळाच्या दाण्यावर चित्र साकारायला अर्धा तास लागला. त्यासाठी अॅक्रेलिक रंगांचा वापर केला आहे.एवढे सूक्ष्म आणि तेही तिळावर साकारलेल्या चित्राचे पुढे काय करणार? असे विचारले असता, ते म्हणाले, अती सूक्ष्म चित्र साकारायचे आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांचे ही मायासाठी मोठी जबाबदारी होती.