
पुणे – पिंपरी पालखी सोहळ्यामध्ये चोऱ्या करणाऱ्या ११ महिलांसह तब्बल ३७ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा आणि दिघी पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालखी सोहळ्यात होणाऱ्या चोरी आणि लुटमारीचे प्रकार रोखण्याच्या अनुषंगाने पोलिसांचा चोख बंदोबस्त नेमला होता. दरम्यान दिघी पोलीस आणि गुन्हे शाखेने तपासचक्रे फिरवत चोरट्यांना अटक केली.
अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, शंकर बाबर, प्रकाश जाधव यांच्यासह विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.