”नायक”चा सीक्वेल येणार.! दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदची मोठी घोषणा

0
WhatsApp Group

आत्तापर्यंत अनेक चित्रपटांचे सिक्वेल बनवले गेले आहेत आणि अजून बरेच चित्रपट तयार आहेत. याच ओळीत बॉलिवूड चित्रपट निर्माता सिद्धार्थ आनंद अनिल कपूर आणि राणी मुखर्जी यांच्या ‘नायक’ चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यात येणार आहे. अलीकडेच प्राइम व्हिडिओने अनेक सिक्वेल चित्रपटांची घोषणाही केली. आता अनिल कपूर आणि राणी मुखर्जी स्टारर ‘नायक’ या सिनेमाचा सिक्वेलही बनणार आहे, ज्याची जबाबदारी सिद्धार्थ आनंदने घेतली आहे.

या चित्रपटाची निर्मिती फायटर आणि पठाण चित्रपटांचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद करत आहेत. सिनेवर्तुळातील वृत्तानुसार, सिद्धार्थने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक मिलन लुथरिया यांच्याकडे सोपवली आहे.

अनिल कपूर, राणी मुखर्जी आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला नायक हा चित्रपट साली प्रदर्शित झाला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. नायक या चित्रपटात अनिल कपूरने एका बातमीदाराची भूमिका साकारली होती, ज्याला एका दिवसासाठी मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते. राजकारण, भ्रष्टाचारापासून गुन्हेगारीपर्यंत अनेक घटकांचा समतोल या चित्रपटात आहे. नायकमध्ये अजूनही मनोरंजन करण्याची ताकद आहे, म्हणूनच निर्माते नायक नंतर त्याच्या सिक्वेलवर काम करणार आहेत. चित्रपटाची कथा लॉक झाली असून सध्या लेखक रजत अरोरा त्याची पटकथा तयार करत आहेत.