IND vs SA T20: मालिकेत बरोबरी साधण्यासाठी ऋषभ पंतची सेना उतरणार मैदानात, बाराबती स्टेडियमवर होणार सामना

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना 12 जून रोजी होणार आहे. कटक येथील बाराबती स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजल्यापासून हा सामना खेळवला जाईल. रविवारी होणारा हा सामना भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण टीम इंडिया पहिला सामना गमावल्यानंतर मालिकेत पिछाडीवर आहे. या सामन्यासाठी शुक्रवारी संध्याकाळीच दोन्ही संघ कटकला पोहोचले आहेत.
कटक स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब आहे. कटक येथे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध आतापर्यंत एकच सामाना खेळले आहेत. टीम इंडियाने कटक येथे 5 ऑक्टोबर 2015 रोजी आफ्रिकन संघाविरुद्ध एकमेव सामना खेळला होता. ज्यामध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ 92 धावा केल्या होत्या. आफ्रिकन संघाने 17.1 षटकांत 4 गडी गमावून हा सामना जिंकला होता. आता जवळपास सात वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा त्याच मैदानावर आमनेसामने येणार आहेत.
भारताचा संघ – ऋषभ पंत (कर्णधार), ऋषभ गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षरे कुमार पटेल, रविंद्र पटेल, रविवर हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
आफ्रिकेचा संघ – तेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मारक्रम, डेविड मिलर, रस्सी वैन डेर ड्यूसेन, रेजा हेन्ड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, द्वैत प्रीटोरियस, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, क्विंटन डी कॉक, एनरिक नॉर्खिया, कगिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी नागिदी, तबरेज शम्सी, वेन पार्नेल