धक्कादायक! 7वीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर ५ महिन्यापासून बलात्कार

WhatsApp Group

जळगाव – मागील ५ महिन्यापासून इयत्ता ७ वीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलीचे गावातील (village) ३ तरुणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर या पोलीस (Police) ठाण्याच्या अंतर्गत घडली आहे.

या घटनेमध्ये ३ आरोपींसह (accused) त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य ४ जणांना पोलिसांकडून अटक (Arrested) करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इयत्ता ७ वीमध्ये शिकणाऱ्या मुलीची गावातील एका तरुणाबरोबर ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत या तरुणाने मुलीला गावाबाहेर नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे.

या घटनेनंतर देखील आरोपीने तिच्यावर बलात्कार (sexual assualt) करणं सुरूच ठेवले होते. या घटनेविषयी आरोपी तरुणाने इतर २ मित्रांना देखील या प्रकारची माहिती दिली. तरुणाने त्याच्या मित्रांना माहिती दिल्यावर ते तरुण त्याच्यावर नजर ठेऊन होते. या दोघा तरुणांनी आपण गावात सगळ्याचा याविषयी सांगू अशी धमकी देत या मुलीवर बलात्कार करत असत.

मागील ५ महिन्यांपासून हे तिघेही तरुण या मुलीवर सतत बलात्कार करत होते. शुक्रवारी रात्री ९ वाजता मुलगी घराच्या बाहेरून अचानक गायब झाली आणि रात्री उशिरा घरी परतल्यावर आईवडिलांनी मुलीला विश्वासात घेत विचारले असता, हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला. गेल्या काही दिवसात या तिन्ही तरुणानी तिच्यावर बलात्कार केला आहे. आता हा त्रास असह्य झाल्याच सांगत मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईवडिलांच्या कानावर घातला आहे.

या घटनेमध्ये पीडितने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीवर बलात्कार करणाऱ्या ३ तरुणांना आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या अन्य चौघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.