Video: विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक भिडले, आमदार एकमेकांच्या अंगावर धावले

WhatsApp Group

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज वेगळ वातावरण पाहायला मिळाल. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. धक्काबुक्कीही झाली. यावेळी 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. या घोषणा सत्ताधाऱ्यांना आवडल्या नाही. त्यामुळे आज विधिमंडळ परिसरामध्ये सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी प्रचंड गोधळाचं वातावरण निर्माण झालं. सत्ताधारी पक्षानेदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.