‘या’ तारखेपर्यंत जाहीर होणार दहावी, बारावी परीक्षांचे निकाल, येथे पाहाता येईल तुमचा Results

WhatsApp Group

राज्यातील दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचे निकाल जूनमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या परीक्षेला बसलेले हजारो विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळने (MSHSEB) सांगितले की दाहावी आणि बारावीचे निकाल (SSC, HSC Exam Results 2022) जूनमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यात एसएससी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात आली होती आणि तर एचएससी परीक्षा राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये घेण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी माध्यमांशी बोलताना सांगितले की, की “शिक्षकांनी सर्व उत्तरपत्रिका तपासणे पूर्ण केले आहे आणि उत्तरपत्रिका बारकोडचे परीक्षण आणि स्कॅनिंगचे काम प्रगतीपथावर आहे. राज्यातील दाहावी (SSC Exam 2022 Results Date)आणि बारावी (HSC Exam 2022 Results Date) परीक्षांचे निकाल अनुक्रमे 10 जून आणि 20 जून पर्यंत घोषित केले जातील.

Maharashtra SSC, HSC Results 2022: असा तपासा निकाल

  • महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in ला भेट द्या.
  • महाराष्ट्र एसएससी (Class10th) किंवा महाराष्ट्र एचएससी (Class 12th) निकाल 2022 वर क्लिक करा.
  • तुमची लॉगिन क्रेडेंशियल जसे की रोल नंबर/नोंदणी क्रमांक आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा आणि submit वर क्लिक करा
  • तुमचा महाराष्ट्र बोर्ड 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी तो सेव्ह करा.

Maharashtra SSC, HSC Results 2022: अधिकृत वेबसाइटची यादी