
मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा (MPSC Mains exam result) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. एमपीएससी २०२० ची मुख्य परीक्षा ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर आज मंगळवारी परीक्षा २०२० चा अंतिम निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर (MPSC website) प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान, प्रमोद चौगुले (Pramod chaugule) हा राज्यात सर्वसाधारण उमेदवारांमधून पहिला आला आहे.
या परीक्षेमध्ये प्रमोद बाळासो चौगुले (बैठक क्रमांक PN005337) हा राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रथम आला आहे. तर रूपाली गणपत माने बैठक क्रमांक (PN002157) ही महिलांमधून तर गिरीश विजयकुमार परेकर (बैठक क्रमांक PN002362) हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे. या परीक्षेच्या माध्यमातून एकूण दोनशे पदावर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे.