गब्बर तीर्थ येथील महाआरतीत पंतप्रधान झाले सहभागी

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर गुजरातमधील गब्बर तीर्थ येथे झालेल्या महाआरतीत सहभागी झाले. पंतप्रधान मोदी यांनी गब्बर तीर्थाजवळील 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या  अंबाजी मंदिरातही दर्शन घेऊन पूजा केली.   मंदिराच्या आचार्यांकडून महाआरती करण्यात आली आणि लेझर लाइट्सच्या साहाय्याने माउंट अबू पर्वतराजीच्या टेकड्यांवर दुर्गामातेची भव्य प्रतिमा दर्शविण्यात आली. सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पंतप्रधानांनी मंदिर अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.

दुर्गामातेची प्रार्थना करून झाल्यावर  पंतप्रधानांनी आपल्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्याची सांगता केली. पंतप्रधानांसोबत गुजरातचे मुख्यमंत्री  भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी  वैष्णव व इतर मान्यवर  उपस्थित होते.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा