पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे होन हाय टेक्नॉलॉजी समूहाचे ( Foxconn ) अध्यक्ष यंग लिऊ यांची भेट घेतली. त्यांनी भारतातील तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती परिसंस्था वाढवण्याच्या उद्देशाने विविध विषयांवर चर्चा केली. होन हाय टेक्नॉलॉजी समुहाच्या (फॉक्सकॉन) ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले; “यंग लिऊ यांच्या बरोबर चांगली भेट झाली. भारताची तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती परिसंस्था वाढवण्याच्या उद्देशाने विविध विषयांवर आमच्यात चर्चा झाली .”
Had a good meeting with Mr. Young Liu. Our discussions covered various topics aimed at enhancing India’s tech and innovation eco-system. https://t.co/a2hgQtKvjG
— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2023