SpiceJet च्या दिल्ली-जबलपूर विमानामध्ये धूर आढळल्यामुळे विमान पुन्हा माघारी; प्रवासी सुरक्षित

WhatsApp Group

SpiceJet च्या दिल्ली-जबलपूर विमानामध्ये धूर आढळल्यामुळे विमान पुन्हा माघारी आले आहे. प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती स्पाईसजेटच्या प्रवकत्यांकडून देण्यात आली आहे. विमान 5000 फूट उंचीवर असताना कॅबिन क्रु ला धूर दिसल्यामुळे त्यांनी तातडीने विमान मागे फिरवले.