पाहा व्हिडीओ: विमानाला भीषण आग, 100 हून अधिक प्रवासी सुरक्षित

WhatsApp Group

चीनच्या नैऋत्य शहर चोंगकिंगमध्ये गुरुवारी तिबेट एअरलाइन्सच्या विमानाला धावपट्टीवरून उड्डाण घेत असताना आग लागल्याची बातमी समोर आली आहे. यात अनेक लोक जखमी झाले आहेत. तिबेटला जाणाऱ्या विमानात ११३ प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्स होते, असे सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले. सर्वांना विमानातून बाहेर काढण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात २५ जण जखमी झाल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. चोंगकिंग जिआंगबेई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिबेट एअरलाइन्सच्या विमानाच्या समोरून आग आणि काळा धूर उडताना दिसत आहे, असे हाँगकाँगच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टने वृत्त दिले आहे. गोंधळात लोक मागच्या दाराने विमानातून बाहेर पडताना दिसत आहेत.

आग आटोक्यात आणण्यात आली असून धावपट्टी सध्या बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. विमान तिबेटमधील न्यिंगचीला रवाना होणार असताना त्याला आग लागली. या घटनेचा तपास करण्यात येत आहे.