पुणे – नाशिकमधील शेंडीच्या डोंगरावरून खाली पडून दोन ट्रेकर्स मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुणे जिल्ह्यातील राजमाची किल्ल्या जवळ असलेल्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरुन पडून एका ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या दुर्दैवी घटनेत ट्रेकर प्रतीक आवळे रा. औरंगाबाद असे मृत झाला आहे. प्रतीक आवळेसोबत त्याचे मित्र पंकज गावदाडे, सुजित लहाने, अभिषेक शेजुळ आणि सागर जैस्वाल हे औरंगाबादहून ट्रेकसाठी आले होते. ट्रेक सुरु झाल्यानंतर प्रतीक आवळे याचा तोल गेल्यामुळे तो खाली पडला आणि त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी प्रतीक आवळे, पंकज गावदाडे, सुजित लहाने, अभिषेक शेजुळ आणि सागर जैस्वाल हे 5 जण औरंगाबादहून ट्रेकसाठी आले होते. ट्रेकी सुरु झाल्यानंतर प्रतीक आवळे याचा तोल गेल्यामुळे तो खाली पडला. ही सर्व घटना ट्रेकर्ससाठी आलेल्या तुषार महाडिक व भारत रायकर या दोघांनी ही घटना बघितली.
या घटनेची माहिती समजताच संतोष दगडे आणि त्यांची टीम कर्जत तसेच स्थानिक गावकरी लगेच ढाक बहिरीजवळ पोहोचले तसेच यशवंती हायकर्स खोपोलीची टीम साहित्यासह ढाकच्या डोंगरावर पोहोचली.
या मदतकार्यावेळी अंधार असल्यामुळे तसेच पायवाट, डोंगर उतार व कड्याच्या बाजूची अरुंद जागा यातून सर्व ट्रेकर्स टीमला गावकऱ्यांनी प्रतीकचा मृतदेह व इतर चौघांना खाली सांडशी गावात आणले आणि त्यानंतर त्याचा मृतदेह कर्जतला पाठवण्यात आला.
हेही वाचा
पाहा, लता मंगेशकर यांची अजरामर गाणी
८ महिन्यांच्या बाळासोबत मोलकरीणीने केलेलं हे कृत्य ऐकून अंगावर उभा राहिल काटा!